E-Paper

डायल 112 ला जाणीवपुर्वक खोटा कॉल करुन माहीती देणाऱ्या इसमावरती गुन्हा दाखल 

कराड तालुका पोलीसांची कारवाई 

डायल 112 ला जाणीवपुर्वक खोटा कॉल करुन माहीती देणाऱ्या इसमावरती गुन्हा दाखल 

कराड तालुका पोलीसांची कारवाई 

कराड प्रतिनिधी :- याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की दिनांक 23/05/2026 रोजी 22.09 वा. कराड तालुका पोलीस ठाणेमध्ये डायल 112 ला इसम नामे-कुणाल सतीश इंगळे वय-20 वर्षे रा. रेठरे बुद्रक ता. कराड जि. सातारा याने डायल 112 ला फोन करुन मी मर्डर केला आहे असा कॉल केला असता कराड तालुका पोलीस ठाणेतील पोलीस हवालदार 687 पवार, व ग्रेपोऊनि श्री. चव्हाण यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ रेठरे बु, ता. कराड येथे जावून सदर इसमास संपर्क केला असता त्याने मी दारुच्या नशेत डायल 112 ला खोटा कॉल केला आहे.

अशी माहीती सांगीतल्याने सदर इसमास ताब्यात घेवून त्याचेवर पोलीसांना जाणीवपुर्वक खोटा कॉल करुन, खोटी माहीती देवून डायल 112 चा गैरवापर केला असलेबाबत त्याचेवर कराड तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजि.नंबर 315/2026 बीएनएस-217, व महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम कलम-85 (1) प्रमाणे गुन्हा नोद केलेला आहे. तरी सर्व नागरीकांना कळविण्यात करण्यात येते डायल-112 ही 24×7 चालणारी अत्यावश्यक सेवा असून त्याचा गैरवापर केल्यास अशाच स्वरुपाचे गुन्हे दाखल करुन कडक कारवाई करण्यात येईल.

मा. पोलीस अधीक्षक निखील पिंगळे सो सातारा, मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर सो. सातारा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड श्रीमती राजश्री पाटील सो. यांच्या मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप सो, यांचे सुचनेनुसार कराड तालुका पोलीसांनी केली कारवाई

सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक निखील पिंगळे सो सातारा, मा. अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर सो. सातारा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड श्रीमती राजश्री पाटील सो., मा. पोलीस निरीक्षक श्री. महेंद्र जगताप सो यांच्या मार्गदर्शनाखाली, ग्रे.पो.उ.नि. चव्हाण, पो.हवा.687 अमित पवार, पो. हवा.508 शशिकांत काळे, पो.कॉ.2400 सुरज चिंचकर, पो. कॉ. 1267 राहुल बेडके यांनी केलेली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!