जयवंतराव भोसले सहकार पॅनलला मागील निवडणुकीपेक्षा जास्त मताधिक्य मिळेल : आमदार डॉ. अतुलबाबा भोसले
असून सहकारातील जाणकार मंडळी आमच्या सोबत

जयवंतराव भोसले सहकार पॅनलला मागील निवडणुकीपेक्षा जास्त मताधिक्य मिळेल : आमदार डॉ. अतुलबाबा भोसले
कराड प्रतिनिधी :- दिनांक 26.05. 2026 याबाबत अधिक माहिती अशी की यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना मर्यादित रेठरे बु तालुका कराड संचालक मंडळ निवडणूक 2026 च्या निमित्ताने जयवंतराव भोसले सहकार पॅनलच्या वतीने आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते
यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की कृष्णा सहकारी साखर कारखाना हा महाराष्ट्रात उच्चांकी दर देणार आहे तसेच सभासदांना वर्षाला 60 किलो मोफत साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र कराड विटा वाळवा खानापूर कडेगाव असे पाच तालुक्यात आहे पाच तालुक्यातील 50000 च्या वर सभासद कारखान्याचे असून सहकारातील जाणकार मंडळी आमच्या सोबत राहतील असा आम्हाला विश्वास आहे,
आमचे राजकारणात प्रतिस्पर्धी असतील पण सहकारात प्रतिस्पर्धा आम्ही कधी केली नाही , एखाद्याचे आम्हाला मदत करण्याची इच्छा असेल तर ती मदत आम्ही घेऊ आमच्या विरोधात कोण उभा आहे हे महत्त्वाचे नाही आम्ही आमची भूमिका सभासदांपर्यंत पोहोचवू
तसेच होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये गाफीलपणा न ठेवता आम्ही मागील पाच वर्षात जे काही काम केले आहे ते तळागाळातील सभासदांपर्यंत मांडायचा आहे , शेतकरी सभासदांची मन जिंकणे ही आमची भूमिका राहील , सध्या जयवंतराव भोसले सहकार पॅनलची स्थिती भक्कम आहे
पाहुयात व्हिडीओ च्या माध्यमातून आयोजित पत्रकार परिषदेमध्ये आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले आणखीन काय म्हणाले खाली क्लिक करा 👇👇👇👇👇




