E-Paper

पत्रकार सौं.मुस्कान तांबोळी यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड

जेष्ठ कवी दंगलकार नितीन चंदनशिवे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा पार पडणार..

माय मराठी टीव्हीच्या पत्रकार मुस्कान तांबोळी यांची राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड..

जेष्ठ कवी दंगलकार नितीन चंदनशिवे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान सोहळा पार पडणार..

कराड प्रतिनिधी — या बाबत अधिक माहिती अशी की, अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना व पिराजी थोरवडे सामाजिक संस्था कराडचे संस्थापक पिराजी थोरवडे यांच्या वाढदिवसानिमित्त बुधवार दिनांक १ जुलै २०२६ रोजी राज्यस्तरीय पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कराड येथील माय मराठी टीव्हीच्या पत्रकार मुस्कान शरिफ तांबोळी यांची निवड केल्याचे अधिकृत पत्र प्राप्त .

अखिल भारतीय स्वाभिमानी संघर्ष सेना व पिराजी थोरवडे सामाजिक संस्थेच्या वतीने गेल्या चार वर्षांपासून विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जात आहे. त्या अनुषंगाने कराड शहरातील सामाजिक, पत्रकारिता व आंतरराष्ट्रीय कराटे प्रशिक्षण या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रभाकर जगन्नाथ थोरवडे, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमेटीचे अध्यक्ष व विद्यमान नगरसेवक राहुल भोसले व कराड नगरपरिषदेचे सेवा निवृत्त अभियंता श्री. अशोक रंगराव पवार यांनाही राज्यस्तरीय पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. माय मराठी टीव्हीच्या पत्रकार मुस्कान शरिफ तांबोळी यांना पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर विविध पक्ष संघटना व सामाजिक कार्यकर्ते व हितचिंतकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!