उपजिल्हा रुग्णालयाचे वरिष्ठ लिपिक श्री.निलेश माने व श्री. कोंडीबा कोळेकर यांचा निरोप समारंभ संपन्न..
कराड

उपजिल्हा रुग्णालयाचे वरिष्ठ लिपिक श्री.निलेश माने व श्री. कोंडीबा कोळेकर यांचा निरोप समारंभ संपन्न..
कराड प्रतिनिधी — या बाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या प्रशासकीय बदल्यांमध्ये कराड येथील स्व.सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाचे वरिष्ठ लिपिक श्री.निलेश माने व श्री. कोंडीबा कोळेकर यांची प्रशासकीय बदली झाल्याने उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ सौ सुनिला लाळे यांच्या हस्ते श्री. माने व श्री.कोळेकर यांचा श्रीफळ शाल देऊन सत्कार करण्यात आला व पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
श्री.निलेश माने हे २०१८ ते २०२६ पर्यंत उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रशासकीय सेवेत कनिष्ठ लिपिक म्हणून त्यांनी आस्थापना विभाग व जन्म मूत्यू विभागात अतिशय प्रामाणिकपणे काम केले. तर श्री. कोंडीबा कोळेकर यांनी आवक जावक ते मेडिकल लिगल केस आणि विवाह नोंदणी विभाग अत्यंत चांगल्या पद्धतीने पारदर्शक पणे कामकाज केले आहे अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.
या वेळी उपजिल्हा रुग्णालयाचे कार्यालयीन प्रभारी अधीक्षक श्री. आदेश कांबळे, सहाय्यक अधिसेविका सौ. मंगल जानकर, गणेश चव्हाण, औषध निर्माण अधिकारी सौ.सविता कुंभार, महेश शिंदे, ईसीजी विभागाच्या सौ.भोसले मॅडम इ. उपस्थित होते.




