E-Paper

कृष्णा नाका अँटो रिक्षा गेट यांच्यावतीने 15 ऑगस्ट रोजी जिलेबी वाटप  

कराड

कृष्णा नाका अँटो रिक्षा गेट यांच्यावतीने 15 ऑगस्ट रोजी जिलेबी वाटप  

कराड प्रतिनिधी : – याबाबत अधिक माहिती अशी की 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कृष्णा नाका ऑटो रिक्षा गेटचे मनोज सूर्यवंशी,भगवंत चव्हाण , तुषार हिनुकले, महंमद मल्लाड, हरिचंद्र अंगरखे, संजय चौगुले, साईराज नलावडे, परवेज भालदार, मारुती पाटील,उमर पटेल, फारूक मुल्ला, सोहेल जमादार, रोहन रसाळ यांच्या वतीने प्रवाशांना व नागरिकांना जिलेबीचे वाटप करत स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या

या रिक्षा गेटच्या वतीने प्रवाशांसोबत फक्त प्रवासी म्हणूनच वागणूक न देता आपुलकी व जिव्हाळ्याचे नाते जपले जाते या रिक्षा गेटच्या परिसरातून अनेक कॉलेजची ओके देखील दररोज कॉलेजला ये जा करण्यासाठी या रिक्षा गेट वरील रिक्षांमधून प्रवास करत असतात येथील रिक्षा चालकांच्या प्रवाशांसोबतची आपुलकी नेहमीच चर्चेचा विषय ठरते रात्री अपरात्री वेळ का न पाहता प्रत्येक प्रवाशाला सुखरूप पोहोचवण्याचे काम अखंडितपणे या रिक्षा गेटवरील सर्व रिक्षा चालक करत असतात सदरचे ऑटोरिक्षा गेट हे प्रियदर्शनी ऑटो रिक्षा युनियनला संलग्न असून आज प्रियदर्शनी ऑटोरिक्षा गेट युनियनचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री अशोकराव पाटील दादा यांनी देखील रिक्षा चालकांच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले व प्रत्यक्ष या ठिकाणी भेट देखील दिली कराड शहरामध्ये अशाच प्रकारचे रिक्षा गेट असावेत व अशाच प्रकारचे रिक्षा युनियन व रिक्षा चालक असावेत अशी मागणी या रिक्षा चालकांच्या उपक्रमामुळे होत असून यांच्या या उपक्रमाचे कराड शहरातील सर्व नागरिकांमधून व विविध स्तरातून कौतुक होत आहे

व्हिडीओ पाहण्यासाठी 👇👇👇 येथे क्लिक करा 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!