
एस एस मोबाईल शॉपी मधील मोबाईल चोरीचा गुन्हा उघड
दोन आरोपीतांना अटक
अंदाजे सुमारे 30 लाख रुपये किमतीचे मोबाईल गेले होते चोरीस
कराड प्रतिनिधी :- याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिकृत माहिती अशी की दिनांक 21/8/2026 रोजी रात्रौ. 02.00 वा.चे सुमारास फेडरल बँकेशेजारी असणारे मोबाईल शॉपीचे दुकानाचे शटर तोडून दुकानात प्रवेश करुन दुकानामधील नवीन मोबाईल चोरी करुन सुमारे 30 लाख रु. किंमतीचे मोबाईलची चोरी झालेली आहे. अशा आशयाची तक्रार मोबाईल शॉपी मालक यांनी दिलेली आहे. सदरबाबत कराड शहर पोलीस ठाणे गुरनं. 1008/2026 बी. एन. एस. कलम 305, 305 (अ), 331 (4), 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्हयाचा तपास विजय गोडसे सहा. पोलीस निरीक्षक (गुन्हे) कराड शहर पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदर गुन्हयाचे घटनास्थळावरील सी.सी.टी.व्ही. फुटेजचे अवलोकन केले असता आरोपीत यांनी गुन्हा करणेकरीता स्विफ्ट गाडीचा वापर केलेला असून ते शामगांव घाट मार्गे गेले असलेबाबत माहिती निष्पन्न झाले. नमूद गाडीचा शोध घेण्याकरीता स्थागुशा सातारा यांचेकडील सपोनि. रोहित फारणे व कराड शहर पोलीस ठाणे डी.बी.कडील डी.बी. पथक पोउनि. निखील मगदूम यांचे नियंत्रणाखाली दोन पथके तयार करुन रवाना झालेले होते.
नमूद पथकाने शामगांव घाट मार्गे ते अहिल्यानगर पर्यंत सुमारे 200 ते 250 सी.सी.टी.व्ही.फुटेज चेक करुन सदर गुन्हयातील स्विफ्ट गाडी बाबत माहिती मिळविली. तसेच सी.डी.आर व एस.डी.आर असे तांत्रीक विश्लेषणाचे आधारे सदर आरोपीत मजकूर यांची माहिती मिळून आलेली आहे. सदरचा गुन्हा हा गुंतागुतीचा असून आरोपीत यांनी त्यांची माहिती पोलीसांना मिळू नये याकरीता टोलनाके चुकवून त्यांनी सदरचा प्रवास केलेला होता. तरी देखील त्याबाबतचे विश्लेषण करुन कौशल्यपुर्ण तपास केला असता अशी बाब निष्पन्न झाली की, सदरची आरोपीत यांची टोळी हरियाणा, राजस्थान येथील असून ते रेकॉर्डचे गुन्हेगार असून त्यांची काही साथीदार महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश येथून अशोक लेयलँन्ड या ट्रकमधून माल भरुन उत्तर भारतात हरियाणा, राजस्थान येथे जातात. त्या साथीदाराने रेकी करुन हरियाणा, राजस्थान मधून दुसरी काही साथीदार बोलावून कराड मध्ये चोरी केल्याचे निष्पन्न झाले.
नमूदचे आरोपीत यांनी दिनांक 21/08/2026 रोजी चोरी करुन चोरीतील मुद्येमाल ट्रकमध्ये भरुन हरियाणा येथे गेले. त्यानंतर तेथून माल भरुन दिनांक 27/08/2026 रोजी पुन्हा आंध्र प्रदेश मार्गे कर्नाटकात गेले. सदर बाबत माहिती विश्लेषण करुन सपोनि. गोडसे, पोउनि. मगदूम व त्यांचे पथकाने दिनांक 30/08/2026 रोजी कर्नाटक येथे रवाना होवून दिनांक 31/08/2026 रोजी वस्कोटी जि. बेंगलोर राज्य कर्नाटक येथून आरोपीत नामे 1) अब्दुलहाय बशीरअहमद वय 51 वर्षे. रा. बावला ता. तौरु जि. नूह मेवात राज्य हरियाणा 2) अलाऊद्यीन जहरुद्यीन वय 31 वर्षे. रा. नेहलाहंडा ता. जेवर जि. गौतमबुध्द नगर राज्य उत्तर प्रदेश यांना अटक केलेले आहे. आरोपीत मा. कोर्टात हजर केले असता मा. कोर्ट यांनी त्यांची दिनांक 07/09/2026 रोजी पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजुर केली आहे. सदर गुन्हयाचे तपासकामी स्थागुशा सातारा येथील एक पथक हरियाणा, राजस्थान येथे गेले असून पुढील तपास सुरु आहे
सदर गुन्हयाचा तपास मा. पोलीस अधीक्षक निखील पिंगळे सो, तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक सो, श्रीमती वैशाली कडूकर, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, स्थानिक गुन्हे शाखा सातारा, दत्तात्रय दराडे पोलीस निरीक्षक कराड शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शना खाली सुरु आहे.
कारवाई पथक :-
मा. पोलीस अधीक्षक सो, श्री. निखील पिंगळे सो, मा. अपर पोलीस अधीक्षक सो, श्रीमती वैशाली कडूकर, मा. उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील, पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, स्थानिक गुन्हे शाखा सातारा, दत्तात्रय दराडे पोलीस निरीक्षक कराड शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. विजय गोडसे, कराड शहर पोलीस ठाणे यांनी केलेला आहे. नमूदचा गुन्हा उघडकीस आणणेकामी दोन पथक तयार करण्यात आलेली होती.
स्थानिक गुन्हे शाखा पथक
सहा. पोलीस निरीक्षक रोहित फारणे, पोलीस उप निरीक्षक परितोष दातीर, पोहवा. शरद बेबले, साबीर मुल्ला, अमित झेंडे, अजय जाधव, लक्ष्मण जगधने, स्वप्निल कुंभार, ओमकार यादव, मोहन पवार, राकेश खांडके, अमृत कर्पे, संजय जाधव, संकेत निकम
गुन्हे प्रकटीकरण शाखा कराड शहर :-
सहा. पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. विजय गोडसे, पोलीस उप निरीक्षक, निखील मगदूम, पोहवा. वसीम संदे, पोलीस नाईक सज्जन जगताप, पोकॉ. धिरज कोरडे, पोकॉ. मुकेश मोरे, पोकॉ. दिग्वीजय सांडगे, पोकॉ. अमोल देशमुख, पोकॉ. मोहसीन मोमीन, पोकॉ. महेश पवार, पोकॉ. मयुर देशमुख, पोकॉ. निलेश विभुते, पोकॉ. आनंदा जाधव, पोकॉ. विजय गुरव, महिला पोकॉ. सोनाली पिसाळ असे पथकाने कारवाई केलेली आहे

आरोपीत नामे 1) अब्दुलहाय बशीरअहमद वय 51 वर्षे. रा. बावला ता. तौरु जि. नूह मेवात राज्य हरियाणा 2) अलाऊद्यीन जहरुद्यीन वय 31 वर्षे. रा. नेहलाहंडा ता. जेवर जि. गौतमबुध्द नगर राज्य उत्तर प्रदेश 👇👇👇👇





