कराड शहरातील मार्केटयार्ड परिसरात अवैध धंदे जोमात
पोलीस उत्पादन शुल्क व अन्न औषध प्रशासनाचे आता दुर्लक्ष का ?

कराड शहरातील मार्केटयार्ड परिसरात अवैध धंदे जोमात
पोलीस उत्पादन शुल्क व अन्न औषध प्रशासनाचे आता दुर्लक्ष का ?
लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून वस्तुस्थितीनिशी व्हिडिओ द्वारे हाकिकत असलेली सर्व माहिती दाखवून देऊन देखील तसेच प्रत्यक्ष सुरू असलेले प्रकाराबाबत व्हिडिओ चित्रीकरण दाखवून देखील प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची हालचाल का नाही ?
कराड प्रतिनिधी :- कराड शहरातील वाढीव हद्दीतील भागात मार्केट यार्ड परिसरात सध्या अवैध धंदेवाल्यांनीं भर नागरी वस्तीत आपले धंदे जोमात सुरु केले असून हेच अवैध धंदेवाले आता कायद्याची व पोलिसांची भाषा शिकवल्या प्रमाणे बोलू लागले आहेत…
ते म्हणतात ना चोराच्या उलट्या बोंबा.. चोर ती चोर वरनं शिरजोर.. अशा म्हणीप्रमाणे अवैध धंदे करायचे पण भाषा मात्र कायद्याची व पोलिसांची बोलायची असा प्रकार सध्या सुरु असून…
अवैध धंदे अगदी प्रशासनाच्या पाठबळाने सुरु असल्यासारखे चित्र निर्माण केल्याचे दिसून येत असून देखील पोलीस प्रशासन उत्पादन शुल्क प्रशासन अन्न औषध प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून असल्याची परिस्थिती सध्या दिसून येत आहे….
गल्ली बोळात मुख्य रस्त्यावर मावा आता भाजीपाला विकल्या सारखा विकला जात आहे तसेच प्रत्येक टपरी मध्ये किराणा दुकानात बिनधास्त पणे गुटखा विकला जात आहे…
आता पुराव्या सह एखादे उदाहरणं याठिकाणी द्यावायचे झाल्यास माव्याचे बोलायचे झाल्यास मार्केट यार्ड पोलीस चौकीच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या पाण्याच्या टाकी खाली नगरपरिषद गाळ्या समोर पोत्यात / पिशवीत भरून मावा विक्री केली जाते मग ह्या रस्त्यावर कितीतरी माता भगिनी ये जा करतात याचे त्यांना भान नसतेच… याचे देखील पुरावे माय मराठी टीव्ही द्वारे आम्ही दाखवू इच्छितो..
आता गुटख्याच्या बाबतीत बोलावयाचे झाल्यास प्रत्येक पान टपरी मध्ये तसेच किराणा मालाच्या दुकानात देखील अगदी सहजरीत्या गुटखा उपलब्ध होऊ लागला आहे याबाबत देखील माय मराठी टीव्हीकडे पुरावे असून ते देखील आम्ही यामध्ये दाखवू इच्छितो…
गांजाच्या बाबतीत बोलावयाचे झाल्यास सिगारेट मधील तंबाखू काढून त्यामध्ये गांजा भरून अगदी सिगारेट असल्यासारखे भासवून बिनधास्तपणे त्याची विक्री केली जात आहे यामध्ये उदाहरण द्यावयाचे झाल्यास मार्केट यार्ड परिसरातील गोल घुमट दर्ग्याजवळ गांजा व मावा अगदी सहजरीत्या उपलब्ध होऊ लागला आहे…
दारूच्या बाबतीत बोलावयाचे झाल्यास धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य असे स्मारक ज्या ठिकाणी उभे राहणार आहे त्याच स्मारक परिसरामध्ये आता ज्या ठिकाणी काम सुरू आहे त्याच्या हाकेच्या अंतरावरती मार्केट यार्ड एक नंबर गेटच्या समोर सर्विसिंग सेंटर मध्ये देशी दारूची विक्री केली जात आहे
सर्विसिंग सेंटर चा मालक यामध्ये सहभागी असून एका व्यक्तीस त्या ठिकाणी बसविले जात आहे व बिनधास्तपणे देशी दारू विकली जात आहे मुख्य रस्त्यालगत असणाऱ्या या सर्विसिंग सेंटर मध्ये अगदी सहजरीत्या देशी दारू मिळू लागल्याने दिवसेंदिवस तळीरामांची व मद्यपींची संख्या या ठिकाणी वाढू लागली आहे
यातीलच एखाद्या मद्यपी कडून ओव्हरलोड होऊन स्मारक परिसराचे विटंबना झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो कारण ज्या ठिकाणी स्मारक परिसराचे कामकाज सुरू आहे तसेच या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सीसीटीव्हीची उपलब्धता नाही त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे
तसेच मार्केट यार्ड परिसरातील नामांकित हॉस्पिटल शेजारी एका घरातून देशी दारूची विक्री केली जाते या ठिकाणी देखील या दारू विक्रेत्याकडे कोणत्याही प्रकारचा वैध परवाना नाही..
हे सर्व ज्या ठिकाणी सुरू आहे ज्या परिसरामध्ये सुरू आहे त्याच परिसरामध्ये पोलीस प्रशासनामार्फत स्वतंत्र पोलीस चौकीची निर्मिती करण्यात आलेली आहे तसेच याच पोलीस चौकीमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपलब्धता देखील आहे याच परिसरामध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यालय देखील आहे या कार्यालयात देखील अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपलब्धता आहे असे असून देखील या परिसरामध्ये अवैध धंदे कोणाच्या मर्जीने व कोणाच्या आशीर्वादाने कोणाच्या छत्रछायेखाली सुरू आहेत असा सवाल या ठिकाणी उपस्थित होऊ लागला आहे कारण नाममात्र कारवाया करायच्या परंतु ठोस आणि प्रभावी कारवाया का होत नाहीत ? अवैध व्यवसायिकांमध्ये इतके धाडस कुठून येऊ लागले ? अवैध व्यवसायिकच कोणीतरी यांना शिकविल्या प्रमाणे आता पोलिसांची व कायद्याची भाषा कशी काय करू लागले आहेत ? हे कुठेतरी थांबले पाहिजे आणि ठोस प्रभावी कारवाया झाल्या पाहिजे जेणेकरून अवैध व्यवसायिकांचे धाडस वाढणार नाही अन्यथा एक दिवस हेच अवैध व्यवसायिक प्रशासनाच्या कॉलरपर्यंत जाण्यास कमी करणार नाहीत..
लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ समजल्या जाणाऱ्या एखाद्या प्रसिद्धी माध्यमाद्वारे पुराव्यानिशी वृत्त प्रसिद्ध करून प्रशासनाला सर्व हकीकत दाखवून देऊन देखील परिस्थिती बदलताना दिसून येत नाही नाम मात्र कारवाया किंवा दुर्लक्ष या पलीकडे प्रभावी अंमलबजावणी होताना सध्या तरी दिसून येत नाही तसेच गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकाऱ्यांना पुराव्यानिशी सर्व बाबी निदर्शनास आणून देऊन देखील अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे
त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक कराड शहर व सातारा जिल्हा पोलीस प्रमुख राज्य उत्पादन शुल्क सातारा जिल्हा प्रमुख अन्न व औषध प्रशासन विभाग सातारा जिल्हाप्रमुख यांनी या बाबींचा गांभीर्याने विचार करून आपल्या संबंधित अधिकारी व कर्मचारी वर्गांना वेळोवेळी कारवायाच्या बाबतीमध्ये सूचित करणे गरजेचे आहे अन्यथा अवैध धंद्यातून मिळणाऱ्या झटपट पैशाच्या जोरावर भविष्यामध्ये संवेदनशील मानल्या जाणाऱ्या कराड शहरात कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो…..








