डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कराड येथे होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित रहावे.– अध्यक्ष राहुल भोसले यांचे आवाहन
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कराड येथे होणाऱ्या कार्यक्रमास उपस्थित रहावे.– अध्यक्ष राहुल भोसले यांचे आवाहन
कराड प्रतिनिधी : — या बाबत ची माहिती अशी की, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कराड येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमेटीच्या वतीने गेल्या तीन दिवसांपासून विविध कार्यक्रम झाले. आज रविवार दिनांक १२ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता मा.प्रदीप बनसोडे यांचे विचारातून प्रबोधन आणि प्रबोधनातून परिवर्तन या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे.
या व्याख्यानामध्ये प्रामुख्याने श्री.प्रदीप बनसोडे हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत आपल्या वाणीतून शिवा काशिद यांचा जीवनपट मांडून सादरीकरण करणार आहेत. तरी आज होत असलेल्या विचारातून प्रबोधन आणि प्रबोधनातून परिवर्तन या कार्यक्रमास कराड शहरातील व उपनगरातील सर्व बहुजन बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमेटीचे अध्यक्ष नगरसेवक राहुल भोसले यांनी केले आहे.
गेल्या ९ एप्रिल पासून स्वच्छता अभियान,नेत्र तपासणी, रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर मॅरेथॉन स्पर्धा,व अंधश्रद्धा निर्मूलन इ.कार्यक्रम पार पडले आहेत. आज चौथ्या दिवशी सुध्दा डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे प्रदीप बनसोडे यांचे विचारातून प्रबोधन आणि प्रबोधनातून परिवर्तन या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे तरी या व्याख्यानाचा श्रोत्यांनी लाभ घ्यावा असे आवाहनही करण्यात आले आहे.




