E-Paper

गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदूम यांच्या धडाकेबाज कामगिरी बद्दल भीम आर्मी संविधान रक्षक दल या सामाजिक संघटनेचे वतीने सत्कार

पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदूम यांचा सत्कार

कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदूम यांच्या धडाकेबाज कामगिरी बद्दल भीम आर्मी संविधान रक्षक दल या सामाजिक संघटनेचे वतीने सत्कार 

कराड प्रतिनिधी  :- याबाबत अधिक माहिती अशी की  एप्रिल महिन्यामध्ये कराड शहर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रामध्ये मलकापूर तसेच विद्यानगर सैदापूर परिसरामध्ये दोन घरपोडीचे गुन्हे घडले होते सदर बाबत पोलीस अधीक्षक श्री तुषार दोषी अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड श्रीमती राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय दराडे यांनी कराड शहर व परिसरातील घरफोडी चोरीच्या अनुषंगाने कराड शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदूम व पथकास सूचना दिलेल्या होत्या 

 त्या अनुषंगाने गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदूम व पथकाने घरफोडी चोरीचे तांत्रिक विश्लेषण करून व सीसीटीव्ही फुटेज ची पाहणी करून घरफोडी चोराचा मागमुस काढत कराड शहर पोलीस ठाण्याकडील दोन घरफोडी चे गुन्हे उघडकेस आणले आहेत नमूद सराईत गुन्हेगार आरोपीत नामे लोकेश रावसाहेब सुतार राहणार लिंगनूर तालुका मिरज जिल्हा सांगली त्याच्यावर सातारा सांगली कोल्हापूर तसेच कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यामध्ये मिळून जवळपास वीस घरफोडीचे चोरीचे गुन्हे दाखल आहेत नमूद सराईत गुन्हेगार आरोपीतांकडून चोरीचे सोन्या-चांदीच्या मुद्देमाल व चोरी करण्यासाठी वापरलेल्या चार चाकी गाडीसह एकूण 15 लाख 20 हजार 500 रुपयांचा मुद्देमालासह ताब्यात घेऊन नमूद आरोपीताच्या मुस्क्या आवडल्या होत्या 

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री तुषार जोशी अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर उपविभागीय पोलीस अधिकारी कराड विभाग कराड श्रीमती राजश्री पाटील श्रीमती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कराड शहर पोलीस ठाणे श्री दत्तात्रय दराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली कराड शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदूम तसेच गुन्हे प्रकटीकरण टीम कडील पोलीस अंमलदार सतीश पाटील संदीप कुंभार सज्जन जगताप अनिल स्वामी धीरज कोरडे दिग्विजय सांडगे निलेश विभुते अमोल देशमुख मुकेश मोरे मोसिन मोमीन आनंदा जाधव महेश पवार सोनाली पिसाळ यांच्या पथकाने केली होती 

या कामगिरी बद्दल भीम आर्मी संविधान रक्षक दल या सामाजिक संघटनेचे सातारा जिल्हा अध्यक्ष संतोष थोरवडे शहर अध्यक्ष मोमीन, सादिक सय्यद, दादाभाई आंबेकरी, राहुल पाटील, महेश गवळी अनिल गायकवाड यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला व अभिनंदन देखील करण्यात आले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!