E-Paper

‘कृष्णा’ची कलनरी आर्ट्स इन्स्टिट्यूट राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रात नवा आदर्श निर्माण करेल : ना. चंद्रकांतदादा पाटील

पुण्यात कृष्णा विश्व विद्यापीठाच्या कलनरी आर्टस् इन्स्टिट्यूटचे उत्साहात भूमिपूजन

‘कृष्णा’ची कलनरी आर्ट्स इन्स्टिट्यूट राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रात नवा आदर्श निर्माण करेल : ना. चंद्रकांतदादा पाटील

पुण्यात कृष्णा विश्व विद्यापीठाच्या कलनरी आर्टस् इन्स्टिट्यूटचे उत्साहात भूमिपूजन

पुणे, ता. २९ : कृष्णा विश्व विद्यापीठाची कलनरी आर्ट्स इन्स्टिट्यूट ही नवीन शैक्षणिक धोरणाला अनुरूप संस्था असून, ती राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रात नवा आदर्श निर्माण करेल, असा विश्वास राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला.

बालेवाडी-पुणे येथे नव्याने सुरू होत असलेल्या इन्स्टिट्यूट ऑफ कलनरी आर्ट्स अँड सायन्स या संस्थेच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यात ते बोलत होते.

व्यासपीठावर कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, सौ. सुवर्णादेवी देशमुख, सौ. उत्तरा भोसले, कराड दक्षिणचे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले, सौ. गौरवी भोसले, माजी आमदार संजय जगताप, पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती सदस्य सौ. मयुरी कोकाटे, नगरसेविका सौ. रोहिणी चिमटे, कृष्णा विद्यापीठाचे विश्वस्त दिलीपराव पाटील, विनायक भोसले, कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा, लहू बालवडकर, आशिष जैन आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना ना. पाटील म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणलेले नवीन शैक्षणिक धोरण हे संधी आणि समाधान मिळवून देणारे आहे. भारतात कौशल्यप्राप्त व्यक्तींची संख्या वाढली पाहिजे यावर त्यांचा भर आहे. या कौशल्यामुळे नोकरीची संधी त्वरित प्राप्त होणार आहे.

अलीकडच्या काळात चांगल्या हॉटेलमध्ये जेवण करणाऱ्या लोकांची संख्या वाढू लागली आहे. अशाठिकाणी चांगल्या शेफना मोठी मागणी आहे. अशावेळी सौ. गौरवी भोसले यांनी दूरदृष्टी दाखवत कृष्णा विद्यापीठाच्या माध्यमातून या प्रकारची नाविन्यपूर्ण इन्स्टिट्यूट पुण्यात उभी करण्याचा घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. या संस्थेच्या माध्यमातून या क्षेत्रातील तज्ञ नक्कीच निर्माण होतील याची मला खात्री आहे, असे ना. पाटील नमूद केले.

डॉ. सुरेश भोसले म्हणाले, कलनरी आर्टस् हे एक विज्ञान आहे. देशभर या क्षेत्राकडे गंभीरपणे पाहिले जात आहे. या क्षेत्रातील उच्चशिक्षित घडवण्यासाठी ही इन्स्टिट्यूट प्रयत्न करणार आहे. याठिकाणी 10 किचन प्रयोगशाळा असून, ग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट कोर्स शिकवले जाणार आहेत. यानिमित्ताने कृष्णा विद्यापीठ नव्या क्षेत्रात प्रवेश करत आहे.

आमदार डॉ. अतुलबाबा भोसले म्हणाले, अत्यंत चांगल्या प्रतीचे शेफ घडविण्याचे काम या संस्थेत होणार आहे. आधुनिक पाककलेचे शिक्षण येथे दिले जाणार आहे. 

माजी आमदार संजय जगताप म्हणाले, आज प्रत्येक देशात फूड इंडस्ट्रीला मोठे महत्व प्राप्त झाले आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात आज ही इन्स्टिट्यूट उभी राहत आहे, याचा आनंद होत आहे.

कृष्णा फौंडेशनच्या कार्यकारी संचालिका सौ. गौरवी भोसले प्रास्तविक करताना म्हणाल्या, की अन्न हे पूर्णब्रह्म समजले जाते. पण योग्य आहार नसेल तर जीवनशैलीजन्य आजार जडतात. त्यामुळे पोषणयुक्त आणि सकस आहाराचे महत्व वाढत असून, या क्षेत्रातील तज्ञ घडविण्याचे काम या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून केले जाणार आहे.

प्रारंभी ना. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले आप्पासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करण्यात आले.

कार्यक्रमाला सातारा जि. प. सदस्य धनंजय ताटे, मलकापूरचे नगराध्यक्ष तेजस सोनावले, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक वसंतराव शिंदे, बाबासो शिंदे, सयाजी यादव, जे. डी. मोरे, अविनाश खरात, विलास भंडारे, कराडचे नगरसेवक सुहास जगताप, माजी नगरसेवक इंद्रजीत गुजर, कृष्णा बँकेचे संचालक शिवाजीराव थोरात, जयवंतराव भोसले नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील, कृष्णा विश्व विद्यापीठाचे कार्यकारी संचालक पी. डी. जॉन, उपकुलसचिव एस. ए. माशाळकर, सहाय्यक कुलसचिव अर्चना कौलगेकर, अधिष्ठाता डॉ. वैशाली मोहिते, डॉ. जी. वरदराजुलू, डॉ. गिरीश पठाडे, डॉ. एन. आर. जाधव, डॉ. शशिकिरण एन. डी., कृष्णा सरिता बझारच्या अध्यक्ष प्रा. डॉ. स्नेहल राजहंस, जयवंतराव भोसले कृष्णा कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक फरांदे यांच्यासह विद्यापीठाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

भोसले कुटुंबाने निर्माण केलेली कार्यसंस्कृती आदर्शवत

कृष्णा समूहाच्या कार्याचा गौरव करताना नामदार चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, की भोसले कुटुंबाने एक यशस्वी कार्यसंस्कृती निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली चालवला जाणारा साखर कारखाना, कॉलेज, शाळा, बँका अशा सर्व संस्था यशस्वीपणे सुरू आहेत. या कुटुंबातील सर्व व्यक्ती प्रभावी आहेत. अशा कुटुंबाच्या नेतृत्वाखाली पुण्यात सुरू होत असलेली ही नवीन इन्स्टिट्यूट निश्चितच प्रगतीपथावर जाईल, याची मला खात्री आहे. त्यामुळेच आमदार डॉ. अतुलबाबांच्या आग्रहाखातर मी आज मंत्रिमंडळाची बैठक सोडून, या भूमिपूजन सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित राहिलो आहे. 

विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार

विद्यार्थ्यांना आधुनिक पाककलेचे धडे मिळावेत आणि या क्षेत्रातील तज्ञांची निर्मिती करण्यासाठी कृष्णा विश्व विद्यापीठाने कलनरी आर्ट इन्स्टिट्यूट पुण्यात सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी भव्य दहा मजली इमारत उभारली जाणार असून, प्रत्येक मजल्यावर दहा किचन प्रयोगशाळा साकारल्या जाणार आहेत. तळमजल्यावर कॅफे तर वरच्या मजल्यावर रेस्टॉरंट साकारले जाणार असून, या इन्स्टिट्यूटमध्ये भारतीय आणि परदेशी पाककला शिकवणारे विविध ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन अभ्यासक्रम सुरू केले जाणार आहेत. या नव्या संस्थेमुळे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार आहे.

पुणे : कृष्णा विश्व विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ कलनरी आर्ट्स अँड सायन्स या संस्थेच्या नवीन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्यात बोलताना उच्चशिक्षण मंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील. बाजूस डॉ. सुरेश भोसले, दिलीपराव देशमुख, आ. डॉ. अतुलबाबा भोसले, सौ. गौरवी भोसले, संजय जगताप, विनायक भोसले व अन्य मान्यवर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!