E-Paper

सातारा येथे बुध्द जयंती उत्साहात साजरी

धम्मचारीनी अभयाज्योती यांच्या प्रमुख उपस्थितीत जयंती उत्सव सोहळा संपन्न.

सातारा येथे बुध्द जयंती उत्साहात साजरी 

धम्मचारीनी अभयाज्योती यांच्या प्रमुख उपस्थितीत जयंती उत्सव सोहळा संपन्न.

सातारा प्रतिनिधी : – याबाबत अधिक माहिती अशी की ” तथागत भ.बुध्दांची जयंती म्हणजे ख-या अर्थाने विजयाची जयंती” धम्मचारीनी अभयाज्योती,पुणे.

संयुक्त जयंती समारोह समिती सातारा,भारतीय बौध्द महासभा सातारा आणि त्रिरत्न बौध्द महासंघ सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने “भगवान गौतम बुध्द ” यांची २५७० वी जयंती १ मे २०२६ रोजी सायं ७.०० वा.सातारा नगरपरिषद,डा. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात मोठया उत्साहात संपन्न झाली.

प्रारंभी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भ.गौतम बुद्ध आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.त्रिरत्न बौध्द महासंघ सातारच्या महिला धम्ममित्र टीमने गाथा पठण केले. उपस्थीत सर्व मान्यवरांचे स्वागत संस्थेच्यावतीने करण्यात आले.

संयुक्त जयंती समारोह समितीचे कोषाध्यक्ष मा.सतीश गाडे यांनी प्रास्ताविक केले.भारतीय बौध्द महासभा सातारा जिल्हाध्यक्ष मा.अशोकजी भालेराव यांनी आपल्या मनोगतामध्ये भारतीय बौध्द महासभा आणि त्रिरत्न बौध्द महासंघ दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू असुन धम्म प्रचार आणि प्रसार करणे व तळागाळापयर्यंत धम्म पोहोचविणे हे एकच उदिष्ट दोन्ही संस्थांचे आहे अशा भावना व्यक्त केल्या.

भारतीय बौध्द महासभा सातारच्या महिला जिल्हाध्यक्ष संगिताताई डावरे यांनी शुभेच्छा दिल्या.

प्रमुख प्रवचनकार धम्मचारीनी अभयाज्योती यांनी आपल्या अमोघ वाणीतून भ.बुध्दांची जीवनप्रवासाची विस्तृत अशी मांडणी केली.अतिशय सुंदर अशा धम्मदेसनेचा लाभ असंख्य धम्म बंधू भगिनींनी घेतला. 

याप्रसंगी संयुक्त जयंती समारोह समितीचे आयु संदिप कांबळे, मा दिलीप भोसले,शाहिर प्रकाश फरांदे,माजी नगरसेवक अमरभाऊ गायकवाड, मा.संजय नितनवरे, त्रिरत्न बौध्द महासंघ सातारचे चेअरमन धम्मचारी संघादित्य, धम्मचारी खेमसेन, मा.वामनराव म्हस्के,मा.गणेश भिसे,मा.मदन खंकाळ इ.मान्यवर उपस्थीत होते.

प्रारंभी शाहिर भिमराव धस्के आणि सहकारी,अश्वघोष कला केंद्र वर्णे यांच्या भीमगीतांच्या बहारदार गायनाने उपस्थीतांना मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संयुक्त जयंती समारोह समितीचे सर्व सदस्य,त्रिरत्न बौध्द महासंघ सातारचे सर्व महिला -पुरुष धम्ममित्र यांनी अथक परिश्रम घेतले.धम्ममित्र ललिता गडांकुश यांनी कार्यक्रमाचे सत्रसंचलन केले. धम्ममित्र छाया साळवे यांनी पाहुण्यांची ओळख करुन दिली. धम्ममित्र सिमा कांबळे यांनी आभार मानले.धम्मपालन गाथेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. उपस्थीतांना भोजनदान करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!