E-Paper

राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी इम्रान मुल्ला यांची बिनविरोध निवड

प्रदेशाध्यक्षपदी इमरान मुल्ला

राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व स्वयंरोजगार संघटनेच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी इम्रान मुल्ला यांची बिनविरोध निवड  

कराड प्रतिनिधी :- याबाबत अधिक माहिती अशी की राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार व संयोजगार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. महारुद्र तिकुंडे यांचा वाढदिवस व संस्थेचा वर्धापन दिन यानिमित्त कराडमध्ये मा. श्री. महारुद्र तिकुंडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय दराडे यांच्या हस्ते इमरान मुल्ला यांना नियुक्तीपत्र देण्यात आले ,

यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष तिकुंडे सर म्हणाले की यापूर्वीच्या इम्रान मुल्ला यांच्या कामाची दखल संघटने कडून घेण्यात आले असून प्रदेशाध्यक्षपदावरती पाठवण्याचा निर्णय हा सर्वानुमते घेण्यात आला आहे त्या अनुषंगाने कराड येथे संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त व माझ्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये इम्रान मुल्ला यांना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी आम्ही देत आहोत तसेच त्यांना याबाबतचे नियुक्तीपत्र देत आहोत 

आजवर सातारा जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारताना इम्रान मुल्ला यांनी अनेक आंदोलने यशस्वीरित्या केलेली आहेत त्यामध्ये आत्मदहन, रास्ता रोको आंदोलन , बेरोजगार युवक युवतींसाठी बँक ऑफ महाराष्ट्र ला लावलेले टाळे ठोका आंदोलन , बेमुदत प्राणांतिक आंदोलन , नोकरी संदर्भात बेमुदत प्राणांतिक आंदोलन , अशी अनेक आंदोलने आजवर इम्रान मुल्ला यांनी केलेली आहेत , याचीच दखल घेत त्यांना राष्ट्रीय अध्यक्षांनी प्रदेशाध्यक्ष पदाची महत्त्वाची जबाबदारी दिलेली आहे ,

इम्रान मुल्ला यांच्या नियुक्तीनंतर समाजामध्ये विविध स्तरातून त्यांना शुभेच्छा मिळत असून त्यांचे कौतुक देखील केले जात आहे !

प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर इम्रान मुल्ला यांच्याशी माय मराठी टीव्ही ने संवाद साधला असता ते म्हणाले की संघटनेमध्ये जिल्हाध्यक्षपदावरती असताना मी आजवर जे जे काम केले त्या कामाची पोच पावती म्हणून मला एक प्रदेशाध्यक्ष म्हणून मोठी जबाबदारी राष्ट्रीय अध्यक्षांनी दिलेली आहे त्या जबाबदारीचे भान ठेवत मी येणाऱ्या पुढील काळात बेरोजगार युवक युवतींच्या समस्या संदर्भात नेहमी आवाज उठवत राहील तसेच अन्याय अत्याचाराच्या विरोधात देखील माझे कार्य सुरू राहील !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!