E-Paper

नीट पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त; युवक काँग्रेसचा कराडमध्ये सरकारविरोधात तीव्र एल्गार

सरकारविरोधात तीव्र एल्गार

नीट पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त; युवक काँग्रेसचा कराडमध्ये सरकारविरोधात तीव्र एल्गार

कराड प्रतिनिधी : – देशभरात विविध स्पर्धा परीक्षा आणि शासकीय भरती प्रक्रियेत सातत्याने समोर येत असलेल्या पेपरफुटीच्या घटनांविरोधात सातारा जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आज कराड येथील दत्त चौकात आंदोलन करण्यात आले. नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी, गैरव्यवस्था आणि अनियमिततेमुळे देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला असून शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात युवक काँग्रेसने तीव्र संताप व्यक्त केला.

या आंदोलनात महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रथमेश आबनावे, प्रदेश सरचिटणीस तथा सातारा जिल्हा प्रभारी भुषण राणभरे, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष नामदेवराव पाटील, सातारा जिल्हाध्यक्ष राहुलराज पवार, तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा वैशाली जाधव, प्रदेश सरचिटणीस अमित जाधव, जिल्हा उपाध्यक्ष समीर इनामदार, प्रदेश सरचिटणीस विश्वजीत जाधव, अजा. अज विभागाचे जिल्हाध्यक्ष संजय तडाखे, तालुका अध्यक्ष देवदास माने, दक्षिण अध्यक्ष चैतन्य पाटील, उत्तर अध्यक्ष प्रवीण वेताळ, विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष मुबीन बागवान, पाटण अध्यक्ष नरेंद्र पाटणकर, तालुका ओ बी सी विभागाचे अध्यक्ष डी एस काशीद, दिग्विजय सूर्यवंशी, शाहरुख मुल्ला, सोशल मीडिया अध्यक्ष दिग्विजय जमाले, राम मोहीते, अक्षय सुर्वे, मुकुंद पाटील, विक्रम पाटील, उमर सय्यद, मयुर पाटील, जिल्हा उपाध्यक्ष उदय जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थी, युवक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभाग घेत शासनाविरोधात घोषणाबाजी केली.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रथमेश आबनावे म्हणाले, देशातील लाखो विद्यार्थी रात्रंदिवस मेहनत करून स्पर्धा परीक्षा देत असताना वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे त्यांच्या कष्टांवर पाणी फेरले जात आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात शासनाने कठोर कारवाई करावी. शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार आता युवक काँग्रेस सहन करणार नाही.

सातारा जिल्हाध्यक्ष राहुलराज पवार यांनी सांगितले की, नीटसारख्या महत्त्वाच्या परीक्षांमध्ये अनियमितता आणि पेपरफुटीच्या घटना समोर येणे ही देशासाठी लाजिरवाणी बाब आहे. लाखो विद्यार्थ्यांचे मानसिक, शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होत असून केंद्र सरकारने याची नैतिक जबाबदारी स्वीकारावी. विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत युवक काँग्रेसचा लढा सुरू राहील.

यावेळी आंदोलकांनी केंद्र आणि राज्य शासनाविरोधात घोषणाबाजी करत पेपरफुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई, परीक्षा प्रक्रिया पारदर्शक करण्याची मागणी केली. तसेच विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी सुरू असलेला खेळ तात्काळ थांबवावा, अशी मागणी आंदोलनातून करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!