E-Paper

कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात नगरपरिषदेने बांधलेली सार्वजनिक मुतारी सुरू कधी करणार ?

सार्वजनिक ठिकाणी मुतारी न उभारता तसेच नागरिकांची कोणत्याही प्रकारे मागणी नसताना उपजिल्हा रुग्णालयातच मुतारी का बांधली ? पालिकेच्या कारभारावर नागरिकांमधून उलट- सुलट चर्चा !

कराड प्रतिनिधी — या बाबत अधिक माहिती अशी की, कराड नगरपरिषद हद्दीतील पेठ बुधवार शिवाजी हौसिंग सोसायटी हा परिसर स्वच्छ व निर्जंतुक करण्यासाठी नगरपरिषदेने ज्या ठिकाणी सार्वजनिक मुतारी होती ती पाडून नागरीकांची गैरसोय केली होती.

तसेच सार्वजनिक मुतारीची मागणी नागरिकांमधून नसताना कराड नगरपरिषदेने स्व.सौ. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात राखीव जागेतील गार्डन येथे सार्वजनिक मुतारी बांधलेली आहे.

पण ती आजतागायत खुली सुद्धा करण्यात आली नाही आमच्या माय मराठी टीव्ही च्या प्रतिनिधीनीं या बाबत मा. मुख्याधिकारी  यांना या मुतारी बाबत विचारणा केली असता त्यांनी लगेच सुरू करु असे सांगितले होते

तरी या बाबतीमध्ये कराड नगरपरिषद लक्ष देणार का ? असा सवाल उपस्थित झाला असून

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या राखीव जागेतील गार्डन मध्ये उभारण्यात आलेली मुतारी हि कराड नगरपरिषद हद्दीतील रस्त्यावर उभारण्यात यावी अशी मागणी काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत असल्याची चर्चा सध्या कराड शहरात सुरू आहे  !

क्रमशा…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!