अपहरण करुन खंडणी मागणा-या आरोपीतांना कराड तालुका पोलीसांकडुन 30 तासात अटक
कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई

अपहरण करुन खंडणी मागणा-या आरोपीतांना कराड तालुका पोलीसांकडुन 30 तासात अटक
कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई
कराड प्रतिनिधी :- याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिकृत माहिती अशी की कराड तालुका पोलीस ठाणे, गुरनं. 482/2026 भा. न्याय.स. कलम 140(2), 308(4), 115(2), 352, 351(2), 3(5) प्रमाणे सदरचा गुन्हा दिनांक 08.08.2026 रोजी दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयातील तक्रारदार यांना आरोपीत यांनी संगणमत करुन मौजे कोपर्डे हवेली ता. कराड येथून फिर्यादी यांना बळजबरीने पांढरे रंगाचे चारचाकी गाडीत घालून फिर्यादी यांना कोपर्डे हवेली येथून कराड-सुर्ली येथे घेवून जावून तू परस्पर जमीन व्यवहार करतोस तुला आता दाखवतो असा दम देवुन चाकू दाखवून आता तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणून आरोपीत यांनी फिर्यादी यांना हाताने, लाथाबुक्यांनी मारहाण केली. सुर्ली येथे घेवून जावून महिला आरोपीत हिचेसोबत अश्लिल फोटो/व्हिडीओ काढून, ते फोटो वायरल करण्याची धमकी देवून अपहरण करून 10,000/-रुपयाची खंडणीची मागणी केली होती.
सदर गुन्हयाचे अनुषंगाने मा. पोलीस अधिक्षक श्री. निखील पिंगळे साो. तसेच मा. अपर पोलीस अधिक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडुकर सोो, यांनी गुन्हा तात्काळ उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या त्यानुसार मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील साो. कराड यांचे मार्गदर्शनाखाली मा. पोलीस निरीक्षक श्री शितलकुमार कोल्हाळ सो, प्रभारी कराड तालुका पोलीस ठाणे यांनी सपोनि भुजबळ यांचेसह गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक तयार करणेत आले होते.
सदर गुन्हयाचा तपासा करीत असताना तांत्रिक माहीतीच्या आधारे तसेच गोपनीय साक्षीदार यांचेकडुन मिळाले बातमीप्रमाणे यातील आरोपीत हे पुणे येथे असल्याचे माहीती मिळाल्याने लगेचच मिळाले बातमीच्या अनुषंगाने डी. बी. स्टाफ पुणे येथे रवाना होवुन सदर आरोपीत कुणाल सुशिल चव्हाण व दोन पुरूष आरोपीत यांना ताब्यात घेणेत आले होते.
आरोपीत यांचेकडे तपास केला असता आरोपीत कुणाल सुशिल चव्हाण, वय 31 वर्षे, रा. कोपर्डे हवेली, ता. कराड जि. सातारा, सध्या रा. खडकी पुणे व दोन पुरुष व महिला आरोपीत यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली असुन आरोपीत यांना वर नमुद गुन्हयात दिनांक 09/08/2026 रोजी अटक करणेत आली असुन त्यांचेकडुन गुन्हयात वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे.
सदर गुन्हा दाखल झालेपासुन 30 तासाच्या आत आरोपीतांना अटक करण्यात आली आहे.
वरील कामगिरी मा. पोलीस अधिक्षक श्री. निखील पिंगळे साो. तसेच मा. अपर पोलीस अधिक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडुकर साो, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती राजश्री पाटील साो. कराड व पोलीस निरीक्षक श्री. शितलकुमार कोल्हाळ सो कराड तालुका पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. भुजबळ गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अमंलदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक येळवे, पोलीस हवालदार सचिन निकम, पोलीस नाईक सागर शिवदास, किरण बामणे, प्रफुल्ल गाडे, विजय यादव, मयुर देशमुख यांनी केली आहे.




