E-Paper

कराड शहरासह तालुक्यातील अवैध धंदेच 100% बंद करा..

शहरातील सुज्ञ नागरिकांमधून सत्यशोधा विषयावरून वेगवेगळ्या चर्चेला उधाण...

कराड शहरासह तालुक्यातील अवैध धंदेच 100% बंद करा..

शहरातील सुज्ञ नागरिकांमधून सत्यशोधा विषयावरून वेगवेगळ्या चर्चेला उधाण…

सत्यशोध आंदोलनाची वेळही येणार नाही व अवैध धंद्याच्या नावावरती आर्थिक तडजोडी कोण करते हे शोधण्याची वेळही येणार नाही !

कराड प्रतिनिधी :- याबाबत अधिक माहिती अशी की 9 ऑगस्ट क्रांती दिनी कराडच्या तहसीलदार कार्यालयासमोर दलित महासंघाच्या वतीने अवैध धंदे सत्यशोध आंदोलन सुरू करण्यात आले होते यामध्ये दलित महासंघाच्या वतीने असा आरोप लावण्यात आला होता की अवैध धंदे सुरू आहेत याच्या नावावरती काही सामाजिक कार्यकर्ते आंदोलने करतात मात्र काही दिवसातच आंदोलने गुंडाळली जातात मग आंदोलन करणाऱ्यांचे मुख्य उद्दिष्ट काय होते , याचा तपास कोणी करत नाही , त्यामुळे आंदोलनाच्या नावावरती अवैध धंदेवाल्यांकडून आर्थिक तडजोड केली जात असल्याचा गंभीर आरोप लावत , पोलीस प्रशासनाने अवैध धंद्या विरोधात आंदोलन करणाऱ्याच्या पाठीमागील सत्य शोधावे त्यांच्याकडून आंदोलन करत असताना बॉण्ड करून घ्यावे , अशी मागणी करण्यात आली होती !

सदरचे धरणे आंदोलन सुरू असताना पोलीस प्रशासनातील काही अधिकारी व आंदोलन कर्ते यांच्यामध्ये या विषयावरती चर्चा झाल्याचे सांगण्यात आले व त्यानंतर रात्री उशिरा आंदोलन स्थळी विद्युत प्रकाशा अभावी ( लाईट नसताना ) रात्री उशिरा मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय दराडे यांच्या हस्ते दलित महासंघाच्या आंदोलन कर्त्यांना लेखी आश्वासनाचे पत्र देण्यात आले…

सदरच्या पत्रात असा उल्लेख करण्यात आला की अवैध धंद्याच्या नावावरती कोणी आर्थिक तडजोड करत आहे असे निदर्शनास आल्यास संबंधितांवरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे या पत्राद्वारे स्पष्ट करण्यात आले , त्यानंतर सदरचे आंदोलन स्थगित करण्यात आले व दलित महासंघाच्या वतीने लेखी आश्वासनाचे पत्र स्वीकारल्याचे फोटो व एक प्रेस नोट काढण्यात आली व प्रसिद्धीसाठी विविध दैनिकांना देण्यात आली त्या अनुषंगाने दिनांक 12 ऑगस्ट रोजी काही नामांकित दैनिकांमध्ये हे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले . प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर सत्यशोध आंदोलन स्थगित…

वर्तमानपत्रात वृत्त प्रसिद्ध होताच शहरातील सुज्ञ नागरिकांनी दबक्या आवाजात वेगवेगळ्या चर्चा सुरू केल्या त्यातील एक चर्चा म्हणजे इथून पुढे आपल्या कराड शहरातील तसेच तालुक्यातील प्रशासनाने अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे साहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कराड शहरासह तालुका 100% अवैध धंदे मुक्त करावा व कराड शहरासह तालुक्यातील सर्वच्या सर्व अवैध धंदे पूर्णपणे बंद करावेत तसेच पोलीस प्रशासनाने आपल्या अधिकारांचा वापर करत इथून पुढे कोणीही अवैध धंदा करण्याचा विचारही करणार नाही अशा पद्धतीने कायद्याचा धाक दाखवत कायद्याची कडक अंमलबजावणी करत कराड शहरासह तालुक्याला शंभर टक्के अवैध धंद्यापासून मुक्त करावे , आणि हे करणे पोलीस प्रशासनासाठी फार अवघड बाब नाही

कारण गेली चार महिने झाले सातारा जिल्हा पोलीस प्रमुख पदी दबंग पोलीस अधिकारी म्हणून नावलौकिक झालेले श्री निखिल पिंगळे यांनी पदभार स्वीकारला आहे , त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून एकच भूमिका ठामपणे ठेवली आहे ती म्हणजे सातारा जिल्ह्यामध्ये कोणत्याही अवैध व्यवसायाला थारा दिला जाणार नाही , आणि खरोखरच जिल्हा पोलीस प्रमुख श्री निखिल पिंगळे साहेबांच्या या निर्णया बद्दल सातारा जिल्ह्यातील सुज्ञ नागरिकांनी कौतुक देखील केले आहे तसेच श्री निखिल पिंगळे सारखे अधिकारी आमच्या सातारा जिल्ह्याला इथून पुढे तरी नेहमीच मिळावेत अशी अपेक्षा देखील व्यक्त केली आहे !

त्यामुळे कराड शहरासह तालुक्यातील पोलीस प्रशासनाला शहरासह तालुका 100% अवैध धंदे मुक्त करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही अशी चर्चा सुज्ञ नागरिकांमधून दाबक्या आवाजात होताना सध्या ऐकावयास मिळत आहेे असे केल्यास परिणामी काय होईल तर अवैध धंद्या विरोधामध्ये कोणत्याही संघटनेस अथवा सामाजिक कार्यकर्त्याला आंदोलन करण्याची वेळ येणार नाही यामुळे सत्यशोधा सारखे आंदोलने असतील अथवा अवैध धंदे मुक्त करा अशी आंदोलने असतील ही करण्याची वेळच येणार नाही आणि जर 100% कराड शहरासह तालुक्यातील बंद झाले तर मात्र पोलीस प्रशासनाला अवैध धंद्याच्या नावावरती कोण आर्थिक तडजोड करत आहे याचा शोध घेऊन त्याच्यावरती कारवाई करण्याची वेळच येणार नाही त्यामुळे कराड शहरासह तालुक्यामध्ये अवैध धंद्या विरोधात वेळोवेळी केल्या जाणाऱ्या फक्त कारवाया इथून पुढे न करता कराड शहरासह तालुक्यामध्ये पोलीस प्रशासनाने संपूर्ण तालुक्याला शंभर टक्के अवैध धंदे मुक्त करावे अशीच चर्चा सध्या सत्यशोध आंदोलनानंतर कराड शहरासह तालुक्यातील सुज्ञ नागरिकांमधून दबक्या आवाजात सुरू आहे….

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!