17 लाख 65 हजार 940 रुपये किंमतीचा गुटखा जप्त..
स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची धडाकेबाज कारवाई..

17 लाख 65 हजार 940 रुपये किंमतीचा गुटखा जप्त..
स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची धडाकेबाज कारवाई..
चिरमुऱ्याच्या पोत्यांच्या आड गुटख्याची वाहतूक..
सातारा प्रतिनिधी :- दि. 03/08/26 याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिकृत माहिती अशी की महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेला गुटखा चिरमुरेच्या पोत्याच्या आड लपवून वाहतुक करणाऱ्या इसमास ताब्यात घेवून 17,65,940/- रुपये किमतीचा 895.8 किलो गुटखा जप्त
सविस्तर माहिती अशी की
श्री. निखील पिंगळे, पोलीस अधीक्षक सातारा, व श्रीमती डॉ.वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेला गुटखा वाहतुक/ विक्री करणारे इसमांची माहिती प्राप्त करुन त्यांचेवर प्रभावीपणे कायदेशीर कारवाई करण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिल्या आहेत
वरिष्ठांनी दिले सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे यांचे अधिपत्याखाली तपास पथक तयार करुन त्यांना गुटखा विक्रेते/वाहतुक करणारे इसमांवर कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत
दि. 03/08/2026 रोजी पोलीस निरीक्षक, विश्वजीत घोडके यांना त्यांचे विश्वसनीय बातमीदारमार्फत बातमी प्राप्त झाली की, दोन इसम ट्रक क्रमांक एमएच 10/झेड 4696 मधुन महाराष्ट्र राज्यामध्ये विक्री व वाहतुकीकरीता बंदी असलेला गुटखा/पानमसाला घेऊन सांगली बाजुकडुन पुणे बाजुकडे घेऊन जात आहे.
त्याप्रमाणे त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे यांचे अधिपत्याखाली पोलीस अंमलदार यांचे पथकास नमुद वाहन ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्याच्या सुचना दिल्या.
त्याप्रमाणे नमुद पथकाने नागठाणे ता. सातारा येथे हायवे ब्रीजजवळ सापळा लावुन रात्रौ 02.30 वा. प्राप्त माहितीमधील मालट्रक एमएच 10/झेड 4696 ताब्यात घेऊन त्यामधील दोन इसमांचेकडे विचारपुस केली असता, त्यांनी वाहनामध्ये विमल पानमसाला असल्याचे सांगितले सदर ट्रकमध्ये पाहणी केली असता चिरमुरेच्या पोत्याच्या आड बाजूस लपवून विमल पान मसाला व तंबाखु असा एकुण 17,65,940/- रुपये किंमतीचा माल व 7,50,000/- रुपये किंमतीचे वाहन असा एकुण 25,15,940/- रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
सदर बाबत अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती रुपाली आप्पासाहेब खापणे यांना कळविलेनंतर त्यांनी समक्ष हजर राहुन ताब्यात घेतलेला अवैध गुटखा/पान मसाला जप्त केला असुन त्याबाबत बोरगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. 234/2026 अन्न व सुरक्षा मानदे कायदा 2006 अन्वयेे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई श्री निखील पिंगळे, पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती डॉ.वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले, बोरगाव पो.स्टे. स्थानिक गुन्हे शाखाचे सपोनि रोहित फार्णे, मच्छिंद्रनाथ पाटील, पोलीस अंमलदार आतिश घाडगे, संतोष सपकाळ, विजय कांबळे, संजय शिर्के, शरद बेबले, अमित झेंडे, प्रविण फडतरे, अविनाश चव्हाण, सुजित भोसले, अमित सपकाळ, स्वप्नील शिंदे, अरुण पाटील, स्वप्नील कुंभार, किरण जगताप, लैलेश फडतरे, ओंकार यादव, अमित माने, मोहन पवार, विशाल पवार, पृथ्वीराज जाधव, रोहित निकम, तसेच बोरगाव पोलीस ठाणेचे दिपकुमार मांढवे, निलेश गायकवाड, सुनिल कर्णे, जगदीश कणसे, विशाल जाधव, धीरज महाडीक, ज्ञानेश ढाणे, केतन जाधव व अमोल कणसे यांनी केली आहे.





