सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ देण्यात यावा.. साहित्य संमेलनात ठराव मंजूर
दलित महासंघाच्या पाठपुराव्याला यश...

सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ देण्यात यावा.. साहित्य संमेलनात ठराव मंजूर
दलित महासंघाच्या पाठपुराव्याला यश…
सातारा प्रतिनिधी :- याबाबत अधिक माहिती अशी की सातारा येथे झालेल्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोप सत्रामध्ये साहित्य महामंडळाच्या कार्यवाह सुनिताराजे पवार यांनी ठरावाचे वाचन केले. त्यामध्ये अण्णा भाऊंना भारतरत्न देणे विषयीचा ठराव संमत करण्यात आला.
ठराव क्रमांक: ८
“मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी माणूस, मराठी संस्कृती, राष्ट्र आणि महाराष्ट्र यासाठी अण्णाभाऊ साठे यांनी मोलाचे योगदान दिले. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रासाठी जो लढा राहिला, त्यामध्ये अण्णाभाऊ साठे आघाडीवर होते. जागतिक कीर्तीचे लेखक आणि कलावंत असलेल्या सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ देण्यात यावा अशी मागणी हे ९९ अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन करीत आहे.” या ठरावाचे सूचक स्वागताध्यक्ष महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले तरअनुमोदक कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी होते.
ठरावाचे वाचन होताच सभागृहामध्ये टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात आणि सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांच्या घोषणांच्या निनादात ठरावाचे स्वागत करण्यात आले.
या महत्त्वपूर्ण ठरावाबद्दल दलित महासंघाच्या वतिने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस, ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील (पाणीपतकार), स्वागताध्यक्ष ना.शिवेंद्रराजे भोसले,कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा.मिलींद जोशी यांना धन्यवाद दिले. या सर्वांनीच प्रा.डॉ.मच्छिंद्र सकटे आणि दलित महासंघाच्या मागणीला सुरूवातीपासूनच सकारात्मक प्रतिसाद दिला होता.
ठरावानंतर दलित महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष प्रकाश वायदंडे, बहुजन समता पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष राम दाभाडे, दलित महासंघाचे सातारा जिल्हाध्यक्ष उमेश खंडूझोडे, कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब दबडे, कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष महावीर सर्वगौड, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सरस्वती कांबळे, युनिव्हर्सिटी स्टुडंट्स असोसिएशनच्या जिल्हाध्यक्ष जाई प्रकाश आदींनी सातारा येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत पेढे वाटून आनंद व्यक्त केला.या ठरावाने महाराष्ट्रातील लोक भावनेचा आदर म्हणून आता महाराष्ट्र सरकारला केंद्र सरकारकडे सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मागणी प्रस्ताव सादर करता येणार आहे.





