E-Paper

उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाची तत्परता 

माय मराठी टीव्हीच्या वृत्ताची घेतली दखल 

उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाची तत्परता 

माय मराठी टीव्हीच्या वृत्ताची घेतली दखल 

पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार नवीन पाण्याच्या टाक्या केल्या उपलब्ध  

 कराड प्रतिनिधी  :- याबाबत अधिक माहिती अशी की माय मराठी टीव्ही ने एक वृत्त प्रसिद्ध केले होते उपजिल्हा रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब… रुग्णालय प्रशासन मात्र फोडतय रुग्णांच्या नातेवाईकांवर खापर..

 या वृत्ताची गंभीर दखल घेत रुग्णालयाच्या प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी पाण्याचा होणारा अपुरा पुरवठा व तांत्रिक बाबी तपासून पाण्याची व्यवस्था करण्याबाबत चर्चा करून मार्ग काढला व तातडीने उपजिल्हा रुग्णालयात पिण्याच्या पाण्यासाठी नवीन पाण्याच्या टाक्या उपलब्ध करण्यात आल्या सध्या पाण्याच्या टाक्या बसवण्याचे काम सुरू झाले असून लवकरच हे काम पूर्ण होऊन इथून पुढे पाण्याची कमतरता भासणार नाही असे चित्र सध्या तरी दिसून येत आहे

उपजिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेची रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांकडून व सर्वसामान्य नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे  

माय मराठी टीव्हीच्या वृत्ताची दखल घेत उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सौ सुनीला लाळे, वैद्यकीय अधिकारी प्रशांत देसाई, कार्यालयीन अधीक्षक श्री सुपेकर साहेब सहाय्यक कार्यालयीन अधीक्षक श्री आदेश कांबळे साहेब यांनी पाठपुरावा केला  

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!