डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कराड येथे होम मिनिस्टर खेळ पैठणी च्या कार्यक्रमाचे आयोजन — प्रवर्तन थोरवडे यांची माहिती
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कराड येथे होम मिनिस्टर खेळ पैठणी च्या कार्यक्रमाचे आयोजन — प्रवर्तन थोरवडे यांची माहिती
कराड प्रतिनिधी — या बाबत अधिक माहिती अशी की, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त कराड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे शुक्रवार दिनांक १० एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता तेजस्विनी प्रस्तुत होम मिनिस्टर खेळ पैठणी चा हा कार्यक्रम आयोजित केला असल्याची माहिती भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमेटीचे प्रवर्तन थोरवडे यांनी दिली.
महिलांच्या आग्रहाखातर मागील वर्षीही होम मिनिस्टर खेळ पैठणी चा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने याही वर्षी होम मिनिस्टर खेळ पैठणी चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमामध्ये प्रथम बक्षीस नगरसेविका सौ.अर्चना नितीन ढेकळे यांच्या कडून एल ए डी टिव्ही दुसरे बक्षीस आर एस मोबाईल शापी यांचेकडून मोबाईल तर तिसरे बक्षीस सौ.सायली राहुल भोसले यांच्या कडून शोकेज कपाट तर इतर बक्षिसे नगरसेविका सौ.योगिता देवानंद जगताप, शंकर हराळे किरण मोबाईल,पटवेकर ब्युटी पार्लर, सिद्दिक बागवान,सौ.दिव्या ओंकार थोरवडे जे के मंडप किशोर थोरवडे, सौ.रेखा अभिजीत तिरमारे यांचे कडून दिली जाणार आहेत तर खास पाच महिलांसाठी लकी ड्रॉ द्वारे प्रियांका संतोष थोरवडे यांच्याकडून पैठणी साड्या देण्यात येणार आहेत. स्पेशल गिफ्ट म्हणून सुर्या फर्निचर यांचेकडूनही गिफ्ट देण्यात येणार आहे. तरी या होम मिनिस्टर खेळ पैठणी च्या कार्यक्रमास कराड शहरातील व उपनगरातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा असे आवाहन भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमेटीच्या वतीने करण्यात आले.





