स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची दमदार कारवाई
दोन आरोपीतांना ताब्यात घेत 02 देशी बनवटीचे पिस्टल सह 02 जिवंत काडतूस जप्त

स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची दमदार कारवाई
दोन आरोपीतांना ताब्यात घेत 02 देशी बनवटीचे पिस्टल सह 02 जिवंत काडतूस जप्त
सातारा प्रतिनिधी :- याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की श्री. निखील पिंगळे पोलीस अधीक्षक, सातारा व श्रीमती डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या इसमांची माहिती काढुन त्यांचेवर कठोर कारवाई करण्याच्या सुचना विश्वजीत घोडके पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना दिलेल्या आहेत. त्याप्रमाणे विश्वजीत घोडके, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांनी पोलीस उपनिरीक्षक श्री. विश्वास शिंगाडे यांचे अधिपत्याखाली विशेष पथक तयार करुन त्यांना कारवाई करण्याच्या सुचना दिलेल्या आहेत.
श्री. विश्वजीत घोडके पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना त्यांचे गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, कराड तालुक्यातील साकुर्डी गावचे हद्यीत कराड-पाटण रोडवरील दुर्गामाता हॉटेलजवळ निळे रंगाचा टीशर्ट घातलेला 20 ते 25 वयोगटातील एक युवक त्याचेकडील अवैध अग्नीशस्त्र (देशी बनावटीची पिस्टल) विक्रीसाठी घेवुन येणार आहे. अशी खात्रीशीर गोपनिय बातमी मिळाल्याने त्यांनी सदरची बातमी पोलीस उपनिरीक्षक श्री. विश्वास शिंगाडे यांचे पथकास देवुन मिळाले बातमीप्रमाणे कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे पथकाने प्राप्त बातमीचे ठिकाणी जावुन एक संशयीत इसमास ताब्यात घेत असताना तो पळुन जाताना कारवाईमधील पथकाने त्यांचा पाठलाग करुन त्यांना पकडुन ताब्यात घेवुन त्यांचेकडुन 02 देशी बनावटीची पिस्टल व 02 जिवंत काडतुसे असा एकुण 1,61,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्याचेकडे चौकशी केली असता त्याने सदरचे पिस्टल व राऊंड त्याचे साथिदाराकडुन विक्री करण्यासाठी आणलेचे सांगितले. नमुद इसमांचे विरुध्द कराड तालुका पोलीस ठाणे येथे भारतीय शस्त्र अधिनियम 1959 कलम 3(1), 25, 5 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 कलम 37(1), 135 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक श्री. निखील पिंगळे, श्रीमती डॉ. वैशाली कडुकर, अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, महेंद्र जगताप, सपोनि रमेश गर्जे, रोहित फार्णे, पोउनि विश्वास शिंगाडे, परितोष दातीर, सचिन भिलारी, पोलीस अंमलदार साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, सचिन साळुंखे, हणमंत भोसले, हसन तडवी, अमित झेंडे, मुनिर मुल्ला, सनि आवटे, अमोल माने, अजित कर्णे, राकेश खांडके, अजय जाधव, मनोज जाधव, राजु कांबळे, शिवाजी भिसे, प्रमोद सांवत, धिरज महाडीक, अमृत कर्पे, तसेच कराड तालुका पोलीस ठाणे कडील पोलीस अंमलदार समीर कदम, दत्तात्रय तायशेटे, विशाल पाटोळे यांनी कारवाईत सहभाग घेतला आहे. सहभागी अधिकारी अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक, सातारा व अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केलेले आहे.
आरोपीतांची नावे 01) सुमित युवराज साठे वय-22 वर्षे, रा.साजुर ता.कराड जि.सातारा (अटक)
02) सुरज ऊर्फ चिक्या जगन्नाथ मोहीते रा.सोहोली ता.कडेगाव जि.सांगली (फरारी)




