उपजिल्हा रुग्णालयाचे नेत्र चिकित्सा अधिकारी श्री.नवनाथ चोपडे यांच्या सेवा निवृत्त निरोप समारंभात सन्मानचिन्ह देऊन गौरव
सेवानिवृत्ती समारंभ

उपजिल्हा रुग्णालयाचे नेत्र चिकित्सा अधिकारी श्री.नवनाथ चोपडे यांच्या सेवा निवृत्त निरोप समारंभात सन्मानचिन्ह देऊन गौरव
कराड प्रतिनिधी — या बाबत च अधिक माहिती अशी की, कराड येथील स्व.सौ.वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात नेत्र चिकित्सा अधिकारी म्हणून कार्यरत असलेले श्री.नवनाथ जालिंदर चोपडे यांच्या सेवा निवृत्त निरोप समारंभात उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
श्री.चोपडे हे सार्वजनिक आरोग्य विभागात नेत्र चिकित्सा अधिकारी म्हणून ३३ वर्ष ४ महिने कार्यरत राहिले. त्यांच्या नियत वयोमानानुसार त्यांना सेवेतून निवृत्त व्हावे लागले.
या वेळी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ सौ सुनिला लाळे यांनी श्री.चोपडे यांनी केलेल्या कामाची प्रशंसा करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ कार्तिक जाधव, डॉ. खैरमोडे मॅडम डॉ.पाटील, अधीक्षक श्री.गजानन सुपेकर, सहाय्यक अधीक्षक श्री.आदेश कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री.चोपडे हे सोलापूर जिल्ह्यातील व्होळेखुर्द येथील शेतकरी कुटुंबातून आलेलं व्यक्तीमत्व असुन त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ( घाटी ) संभाजी नगर येथे १८ व्या रैंक मधून नेत्र चिकित्सा प्रशिक्षण १९९० ते १९९१ मध्ये प्राप्त केली. नेत्र चिकित्सा अधिकारी म्हणून तरडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १९९३ साली रुजू झाले. श्री चोपडे यांनी वडगाव हवेली, जिल्हा रुग्णालय सातारा, उपजिल्हा रुग्णालय कराड, दहिवडी,म्हसवड,पाटण, ढेबेवाडी, उंडाळे, इत्यादी ठिकाणी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे.
कराड च्या उपजिल्हा रुग्णालयात त्यांनी सलग सहा वर्षे व त्या नंतर पाच वर्षे सेवा केली.कराड व परिसरातील सामाजिक संस्थांच्या वतीने विविध पुरस्कार, मानपत्र, सन्मान चिन्ह व विशेष अतिथी म्हणूनही गौरविण्यात आले होते.
उपजिल्हा रुग्णालयाच्या सेंट्रल हॉलमध्ये आयोजित केलेल्या निरोप समारंभ कार्यक्रमात श्री.नवनाथ चोपडे व त्यांच्या सौभाग्यवती सौ.शोभा चोपडे यांचा रुग्णालयीन कर्मचारी यांचे कडून यथोचित सत्कार करण्यात आला.
या निरोप समारंभ कार्यक्रमास रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, नर्सेस व इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक महेश शिंदे यांनी केले तर शेवटी सहाय्यक परिसेविका सौ. सुवर्णा जेटीथोर यांनी आभार मानले.





