सैनिकांच्या जिल्ह्यानंतर आता सोबतच ‘अग्निशमन जवानांचा जिल्हा’ म्हणून साताऱ्याची नवी ओळख
सातारा

सैनिकांच्या जिल्ह्यानंतर आता सोबतच ‘अग्निशमन जवानांचा जिल्हा’ म्हणून साताऱ्याची नवी ओळख
सातारा प्रतिनिधी : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) अंतर्गत झालेल्या भरती प्रक्रियेमध्ये सातारा जिल्ह्यातील तब्बल 24 जवानांची निवड झाली असून, ही जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे. वाहनचालक व फायरमन पदांसाठी निवड झालेल्या या युवकांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे.
सातारा जिल्हा हा परंपरेने “सैनिकांचा जिल्हा” म्हणून ओळखला जातो. देशसेवेसाठी मोठ्या प्रमाणात युवक सैन्यात दाखल होण्याची गौरवशाली परंपरा या जिल्ह्याला लाभली आहे. त्याचप्रमाणे गेल्या काही वर्षांपासून अग्निशमन क्षेत्रातही सातारा जिल्ह्यातील युवक विविध शासकीय व निमशासकीय संस्थांमध्ये मोठ्या संख्येने निवड होत आहेत. त्यामुळे आता “अग्निशमन जवानांचा जिल्हा” म्हणूनही साताऱ्याची नवी ओळख निर्माण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
निवड झालेल्या उमेदवारांमध्ये किशोर काळभोर यांची वाहनचालक पदावर तर संकेत कुंभार, वैभव कोरडे, योगेश ठोंबरे, महेश गेंड, गुणवंत मोहिते, अक्षय बागल, मयूर पाचगणे, शुभम माळी, सुमित फरांदे, अविनाश शिंगटे, विशाल इंगळे, मनोज पवार, राकेश बाबर, शुभम पवार, प्रतीक ननावरे, धिरज शिंदे, माणिक माने, अमर भाडळकर, अजय साळुंखे, अक्षय सावंत, गौरव सुरज शिंदे आणि रोहित गायकवाड यांची फायरमन पदावर निवड झाली आहे.
या सर्व यशस्वी जवानांचे कुटुंबीय, मित्रपरिवार तसेच जिल्ह्यातील नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत असून त्यांच्या पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
“सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या साताऱ्याची आता ‘अग्निशमन जवानांचा जिल्हा’ म्हणूनही नवी ओळख निर्माण होत आहे, ही जिल्हावासीयांसाठी अभिमानाची बाब आहे.”
सर्व निवड झालेल्या जवानांचे मनःपूर्वक अभिनंदन व भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! 💐🚒🇮🇳




