E-Paper

17,09,900 /- रुपये किमतीचा बेकायदेशीर स्फोटक साठा व वाहने जप्त तिघांवर गुन्हा दाखल 

स्थानिक गुन्हे शाखा सातारा व वडूज पोलीस स्टेशन यांची धडाकेबाज कारवाई

17,09,900 /- रुपये किमतीचा बेकायदेशीर स्फोटक साठा व वाहने जप्त तिघांवर गुन्हा दाखल 

स्थानिक गुन्हे शाखा सातारा व वडूज पोलीस स्टेशन यांची धडाकेबाज कारवाई 

मायणी प्रतिनिधी  :- श्री निखिल पिंगळे पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती डॉ. वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सातारा जिल्ह्यात बेकायदेशीरपणे स्फोटक पदार्थांची वाहतूक तसेच साठा करणाऱ्या आयुष्यांची माहिती प्राप्त करून त्यांचे वर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील अजित कर्णे,प्रवीण पवार, स्वप्निल दौंड यांचे पथक तयार केले होते.

दिनांक 26/06/2026 रोजी स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री विश्वजीत घोडके यांना विश्वसनीय बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की मायणी ते विटा रोड लगतच्या गरवारे वस्ती येथे दोन इसम हे त्यांच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाच्या दोन बुलेरो गाड्यांमधून जिलेटिन व इतर स्फोटक पदार्थांची बेकायदेशीरपणे विक्री करत आहेत.

या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने वडूज पोलीस स्टेशन अंकित मायणी पोलीस दूर क्षेत्र या ठिकाणी जाऊन वडूज पोलिसांचे व त्यांच्या अंमलदारांची संपर्क साधला दोन पंचांना सोबत घेऊन दिनांक 27/06/2026 रोजीच्या 00.10 वाजता मिळालेले बातमीच्या ठिकाणी छापा टाकून घटनास्थळाची संशयित वाहनाची झडाती घेतली असता त्यात खाकी रंगाचे बॉक्स आढळून आले त्यावर सुपर पॉवर नाईंटीन एक्स, डेंजर एक्स्प्लो जीव असे लिहिलेले होते घटनेचे गांभीर्य ओळखून नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून बीडीएस व फॉरेन्सिक पथकाला प्राचारण करण्यात आले. बीडीएस पथकातील शान आझाद याने हुंगून सदर बॉक्स मध्ये स्फोटके असल्याचा अचूक इशारा दिला

यानंतर पथकाने अत्यंत काळजीपूर्वक स्फोटके बाहेर काढून परिसर सुरक्षित केला. त्यामध्ये जिलेटिन कांड्यांचे 9 बॉक्स त्यामध्ये 1800 नग, विविध प्रकारचे डेटोनेटर्स त्यामध्ये इलेक्ट्रिक, नॉन इलेक्ट्रिक,ऑर्डिनरी डेटोनेटर्स व सेफ्टी फ्युज तसेच दोन बुलेरो वाहने तसेच एक टाटा कंपनीचा बंद स्थितीतील टेम्पो असा एकूण 17,09, 900 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.

त्यानंतर तो मुद्देमाल सुरक्षिततेच्या कारणास्तव परवानाधारक मॅक्झिनमध्ये सुरक्षित ठेवण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी आरोपीता विरुद्ध वडूज पोलीस स्टेशन येथे स्फोटक पदार्थ अधिनियम 1804 चे कलम 9 (ब) 1( ब ) स्फोटक पदार्थ अधिनियम 1908 चे कलम 5 व भारतीय न्याय संहिता कलम 288 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

आरोपीतांची नावे पुढील प्रमाणे 

१) विशाल लक्ष्मण जाट (वय ३९, सध्या रा. मायणी, ता. खटाव; मूळ रा. रायपूर, जि. भिलवाडा, राजस्थान)

२) बारुलाल लक्ष्मण जाट (सध्या रा. मायणी, ता. खटाव; मूळ रा. राजस्थान)

३) शंकर बेनीराम चौधरी (रा. मायणी, ता. खटाव – मालक व पुरवठादार)

सदर कारवाई श्री निखिल पिंगळे पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती डॉक्टर वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  श्री विश्वजीत घोडके, पोलीस हवालदार अजित करणे, प्रवीण पवार, स्वप्निल दौंड, अमित सपकाळ यांनी तसेच वडूज पोलीस स्टेशनचे श्री घनश्याम सोनवणे पोलीस निरीक्षक शिंदे पोलीस हवालदार चव्हाण, काळेल महिला पोलीस अंमलदार चव्हाण यांनी केली असल्याने श्री निखिल पिंगळे पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती डॉक्टर वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांनी कारवाई करणाऱ्या अधिकारी व अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!