E-Paper

कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे ३ फुटावरून ४ फुटापर्यंत उघडले जाणार  

सावधानतेचा इशारा

सावधानतेचा इशारा

कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे ३ फुटावरून ४ फुटापर्यंत उघडले जाणार  

कोयना धरणातून दि. 31.जुलै 2026 रोजी रात्री बारा वाजता 22470 क्युसेक विसर्ग करून कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार 

कोयना धरण अपडेट्स

 कोयना नगर प्रतिनिधी  :- दि. 31.07.26 याबाबत कार्यकारी अभियंता, कोयना सिंचन विभाग, कोयनानगर यांनी सूचित केले आहे की  कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामधील चालू असणाऱ्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ होत आहे. 

कोयना धरणाची पाणी पातळी नियंत्रित करणेसाठी दि. ३१ जुलै २०२६ रोजी रात्री १२:०० वा. कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे ३ फुटावरून ४ फुटापर्यंत उघडून २२,४७० क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे.*

कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू असून त्याद्वारे १०५० क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. कोयना नदीमध्ये एकूण २३,५२० क्युसेक विसर्ग सुरू होईल.

तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येणार्‍या येव्यानुसार सांडव्यावरून विसर्ग वाढवला जाऊ शकतो.

धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असलेने नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देणेत येत आहे. तरी नदी तीरावरील गावातील नागरिकांनी नदी पात्रात जाऊ नये. नदी काठावरील ग्राम प्रशासन व संबंधित यंत्रणा यांनी नोंद व उचित खबरदारी घ्यावी असे कार्यकारी अभियंता, कोयना सिंचन विभाग, कोयनानगर यांनी सूचित केले आहे !

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!