
डॉ.विकास देशमुख यांचे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित
मायणी : माय मराठी टी. व्ही.प्रतिनिधी अमोल.रा.भिसे
याबाबत अधिक माहिती अशी की मायणी ता.खटाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या परिसरातील सन १९६४ सालापासून सुस्थितीत असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा शालेय इमारतीचे बांधकामानिमित्त काढण्यात आला होता. संबधित खात्यांना वारंवार लेखी व तोंडी निवेदन देऊन सुद्धा त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले गेले.सदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सन्मानपूर्वक पुर्नस्थापना करण्याच्या प्रमुख मागणीसाठी तलाठी कार्यालय मायणी याठिकाणी सुरु असलेले आमरण उपोषण शनिवारी १५ ऑगस्ट रोजी प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर तात्पुरते स्थगित करण्यात आले.सामाजिक कार्यकर्ते डॉ.विकास देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सदर आंदोलन सुरु होते. उपोषणस्थळी खटाव तालुका पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सौ.संगीता गायकवाड मॅडम,बांधकाम विभागाचे अधिकारी खाडे साहेब, सहाय्यक पोलीस निरिक्षक विक्रांत पाटील साहेब यांनी भेट दिली. गट शिक्षणाधिकारी सौ. संगीता गायकवाड मॅडम यांनी उपोषणकर्त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या आणि त्या अनुषंगाने वीस तारखेच्या आत उचित पावले उचलली जातील असे आश्वासन उपोषणकर्त्यांना लिखात स्वरूपात दिले.छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभारण्यास दिरंगाई झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.यापुढे असं होणार नाही असा शब्द त्यांनी दिला.उपोषणकर्त्यांचे समाधान होईल अशी उत्तरे त्यांनी या अनुषंगाने दिली.मायणी ग्रामस्थांनी त्या सर्व मान्यवरांच्या शब्दाला मान देऊन, येणाऱ्या सहा महिन्यात महाराजांचे सन्मान जनक असे स्मारक या ठिकाणी होईल.या शब्दाखाली आणि छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा परिषद शाळा मायणी असे नामकरण होईल.या आश्वासनानंतर सदरचे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले. उपोषणकर्त्यांनी सर्व आलेल्या मान्यवरांचे आभार मानले.या ठिकाणी संविधानाचा विजय झालेला आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे अधिकार दिले आहेत.त्या अधिकाराचा पुन्हा एकदा विजय झालेला दिसून येतो.अखंड हिंदुस्तानचे आराध्या दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक येणाऱ्या पिढ्यांना कायम प्रेरणा देत राहील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली गेली.
सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण व अर्थ खात्याच्या सभापती मा.सौ.तेजस्विनी कदम यांनी उपोषणकर्ते डॉ विकास देशमुख यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून सांगितले की,सदर विषयाचा लवकरात लवकर पाठपुरावा करून येत्या दिवसात योग्य तो निर्णय घेतला जाईल.असे आश्वासन डॉ.विकास देशमुख यांना देऊन उपोषण सोडण्यास विनंती केली.त्यांच्या विनंतीला मान देऊन डॉक्टर देशमुख यांनी उपोषण तात्पुरते स्थगित केले.
यावेळी मा.आ.डॉ.दिलीपरावजी येळगावकर,जिल्हा परिषद सदस्य ॲड,सुरज पाटील,सरपंच प्रतिनिधी रणजीत माने,विकास सकट अध्यक्ष युवा क्रांती दल महाराष्ट्र राज्य,राज बहुउद्देशीय विकास संस्था मायणीचे अध्यक्ष राजाराम कचरे व पदाधिकारी,जय बजरंगबली गणेश मंडळाचे अध्यक्ष नितीन पडळकर व पदाधिकारी, दिपक कणसे,राष्ट्रवादी कॉग्रेस शेतकरी सेलचे खटाव तालुका अध्यक्ष, हेमंत जाधव,स्वप्निल घाडगे,विलास सोमदे, किसन सोमदे,प्रविण वाघ तसेच अनेक शिवप्रेमी,मायणी ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.





